प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी संदर्भातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. ६ जुलै) तासगाव येथील श्रीराम मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण, महाआरती व निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकार व श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.आंदोलनात पुरण मलमे (उपतालुकाप्रमुख),प्रमोद सावंत (शहरप्रमुख),जॉन जमादार,शहाजी जाधव,दिलीप कोळीगुड्डे,बाहुबली पाटील,दीपक पाटील,गणेश पाटील,विलास जमदाडे, राहुल माने,रूपाली सावंत,कामिनी कोळी,हनुमंत सानप,शंभूराज खरमाटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या