सांगली, दि. ३ : सांगली विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आणि श्री गणरायाच्या कृपेने सर्वांचे लाडके, कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ हे दि. २७ जून २०२६ रोजी झालेल्या अपघातातून सुखरूप बचावले. त्यांच्यासमवेत असलेले स्वीय सहायक अमोल कणसे, अंगरक्षक नागेश भोकरे, चालक गणपती (राजू) दरेकर तसेच छायाचित्रकार विकास गुंडप हे देखील या अपघातातून सुरक्षित बचावले.
या आनंददायी प्रसंगानिमित्त श्री गणरायाच्या कृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती संपन्न झाली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक तथा भाजप पदाधिकारी श्री. सागर बिजरगी यांनी केले होते.
यावेळी सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक (बाबा) शिंदे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, अजिंकीयन वूमन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजिरीताई गाडगीळ, स्थायी समिती सभापती अतुल माने, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, नगरसेवक ऋषिकेश सूर्यवंशी, युवराज गायकवाड, रवींद्र सदामते, उदय बेलवलकर, सुरेश बंडगर, नगरसेविका गीताताई, ग् गणपती साळुंखे, सरचिटणीस स्मिताताई भाटकर, उपाध्यक्ष विजय साळुंखे, संदीप कुकडे, शरद देशमुख, हेमलताताई मोरे, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, मंडल अध्यक्ष अमित देसाई, रवींद्र वादवणे, सुजित राऊत, अजय देशमुख, शुभम देसाई, राजू गवळी, सुनील भोसले, सागर बिजरगी, वरद पडळकर, माधुरी वसगडेकर, प्रीती काळे, अश्विनी तारळेकर, मनीषा सातपुते, शोभा राजमाने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या