सांगली प्रतिनिधी : सांगली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मार्च २०२६ च्या राज्य अर्थसंकल्पात महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
मंजूर झालेली प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
१. नांद्रे आणि कर्नाळ पूल ते ओलेकर वस्ती रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ९.०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
२. शिवशंभो चौक ते बायपास रोड रस्ता रुंदीकरणासाठी १.७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
३. हरिपूर ते अंकली फाटा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ९.०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
४. खरे क्लब हाऊस ते इनामधामणी जकात नाका या रस्त्याच्या सुधारणेसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
५. काकानगर ते म्हसोबा जंक्शन रस्ता सुधारणेसाठी ४५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
६. मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्ता सुधारणा साठी ४.३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीबाबत बोलताना आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले की, "सांगली मतदारसंघातील अंतर्गत आणि मुख्य रस्ते दर्जेदार असावेत, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेन्द्रसिंहराजे भोसले यांनी या कामांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या विकासाची गाडी सुसाट धावत आहे. हा निधी केवळ रस्त्यांसाठी नसून सांगलीकरांचा प्रवास सुरक्षित आणि जलद करण्यासाठी आहे."
येत्या काळात या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल." या कामांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक सुधारण्यासोबतच ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे. आमदार गाडगीळ यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे आभार मानले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या