जत प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी मनोहर अमोल कोंडीकीरे नवोदय परीक्षेत जत तालुक्यातून दुसरा व जिल्ह्यातून 44 वा क्रमांक घेऊन यश मिळवले आहे. हे यश त्याने अथ्थक परिश्रम व मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे.
त्याचे वडील अमोल कोंडीकिरे व आई जयश्री यांनी त्याच्या प्रयत्नाला वेळोवेळी साथ दिली त्यामुळे त्याने यश संपादन केले.
मनोहर ने त्याच्या गावाचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे. नवोदय परीक्षा ही स्पर्धात्मक मानली जाणारी अशी परीक्षा त्यात त्याने ठसा उमटवला आहे.
जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आण्णासो पांढरे यांच्या हस्ते मनोहरचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्याचे आई-वडील यांचाही शाल, श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राधिका कोंडीकीरे मॅडम यांनी मनोहरला शुभेच्छा दिल्या.
जिरग्याळ केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय जगताप साहेब यांनी मनोहरला भरभरून शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांचा सर्व मार्गदर्शक शिक्षकास सतत पाठिंबा असतो.
शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून श्री नखाते सर, श्री काळे सर , श्री चौरे सर, श्री सपकाळ सर, श्री पाटील सर हे लाभले आहेत. जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे विद्यार्थ्यांना वर्षभर शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचे सर्व विषयाचा मार्गदर्शन करून सराव घेतला जातो व विद्यार्थ्यांना यशाचा शिखरापर्यंत पोहोचण्याचा आटोकात प्रयत्न मार्गदर्शक शिक्षक करतात. मनोहर ने नवोदय परीक्षेत आपला यशाचा ठसा उमटवल्याबद्दल विविध स्तरातून त्याच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या