प्रतिष्ठा न्यूज
कडेगांव प्रतिनिधी : मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही तर ती अस्तित्वाची ओळख आहे हेच भाषेचे अस्तित्व अधिक सामर्थ्यशाली व्हावे. साहित्यिकानी केवळ भाषा दिन साजरा न करता मराठी वाढीसाठी उपक्रम करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन अमृतवेल मीडियाचे समूह संपादक धर्मेंद्र पवार यांनी केले . मराठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कडेपूर येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड, पांडुरंग माळी कला अकादमी तडसर निमंत्रितांचे राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा" अंध कवी चंद्रकांत देशमुखे काव्य मंच "सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्र पवार बोलत होते. कवी संमेलनाध्यक्ष भीमराव धुळुबुळू होते.
कवी पांडुरंग माळी काव्यरत्न पुरस्कारार्थी कवी कांचन मून( पुणे) अनिसा सिंकदर शेख(दौंड) सायरा बानू चौगुले( माणगांव ,रायगड) दयासागर बन्ने (सांगली) मन्सूर जमादार (भिलवडी) सौ. प्रतिभा मगर यांना पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पवार पुढे म्हणाले की संतांनी, कवी, लेखकांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध करत ताकद दिली आहे. संत ज्ञानेश्वर पासून ते कुसुमाग्रज आणि आजच्या पिढीतील लेखकांनी मराठी भाषेचा समृद्ध असा वारसा निर्माण केला आहे हा वारसा नव्या पिढीला विश्वासात घेऊन मराठी भाषेची व साहित्य अधिक रुजवण्यासाठी सर्व साहित्यिकानी मिळून प्रयत्न करण्याची आज गरज आहे .नवी पिढी पुस्तक वाचन वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.. त्यासाठी अमृतवेलच्या माध्यमातून पुस्तक व वाचन आकलन स्पर्धा घेतली जात आहे. नव्या पिढीला वाचनास प्रोत्साहन दिले जाते आज या उपक्रमामुळे नवी पिढी ही पुस्तकाकडे वळू लागली आहे व वाचन करु लागली आहे आज ही बाब निदर्शनात आली आहे. प्रारंभी प्रस्ताविक व स्वागत सदानंद माळी यांनी केले. हुतात्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उद्घाटक डॉ सुनिल फडतरे व स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ .लालासाहेब जाधव यांनी सर्व उपस्थिताचे स्वागत केले .साहित्य सम्राटचे संस्थापक कवी विनोद अष्टूळ (पुणे) ,नरके फाउंडेशनचे कवी सीताराम नरके (पुणे), गझलकार बाबाजी मगदूम(पुणे) डॉ विजया पवार (कराड) जयवंत घोरपडे ,जयश्री यादव (कडेपूर) शबनम मुल्ला , सु धों मोहिते , तानाजी राजे जाधव, प्रदीप पवार, कृष्णा जाधव, नारायण पवार जयवंत रोकडे इ मान्यवर उपस्थित होते सूञसंचलन सौ विजया पवार तर अमर ढोणे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या