जय प्रतिनिधी : शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहारी व सामाजिक ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार व बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर ता. जत जि. सांगली येथे शनिवारी दिनांक14/03/2026 रोजी सकाळी भरवण्यात आला होता.
या आठवडी बाजारासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला फळे खाद्यपदार्थ विकण्यासाठी बाजारात घेऊन आले होते. बाल चुकल्यानी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. मार्च महिना असल्यामुळे बाजारात येणाऱ्या पालकांसाठी विद्यार्थ्यांनी थंड ,पेय, चहा, नाष्टा, भेळ, पाणीपुरी ,मिसळ मंचुरियन असे विविध पदार्थ विकण्यासाठी स्टॉल लावले होते.
बाल आनंद मेळावा व बाजार याचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक प्रकारचा वेगळा भाग निर्माण केला होता व त्यासाठी वेगवेगळी नाव देण्यात आली होती जशी की खाऊगल्ली, भाजीपाला, बाजार ,खाद्यपदार्थ बाजार थंड पेय स्टॉल, कडधान्य दुकान ,फळ मार्केट असे विविध विभाग केलेले होते.
जिरग्याळ केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय जगताप साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा उत्सव वाढविला व भरभरून खरेदी केली.
बाल आनंद मेळावाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आण्णासो विलास पांढरे साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी केले. याप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील तसेच मल्हार हायस्कूलचे चेअरमन राम पाटील साहेब ,अण्णासो पांढरे ,धनाजी हजारे, वकील नाईक ,आप्पासो पांढरे ,किसन पाटील, अमोल कोंडीकीरे गावातील प्रतिष्ठान नागरिक पालक वर्ग व महिला बचत गट सर्व अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान महिला बचत गटाच्या साहेब जयश्री कोंडीकिरे मॅडम व राधिका मॅडम यांनी दिले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, काळे सर, नखाते सर, चौरे सर सपकाळ सर, पाटील सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्टॉल नियोजन विविध व्यवस्थापन करून आठवडी बाजार व बाल आनंद मेळावा यशस्वी केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या