प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १६ : जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडून जिल्ह्यातील एलपीजी गॅस वितरकांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये सर्व गॅस वितरकांनी ओटीपी प्रणालीद्वारे घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गॅस वितरकांनी आपल्या अडचणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगितल्या. त्या शासनस्तरावर पोहोचवून योग्य उपाययोजना करण्यात येतील असे यावेळी प्रशासनामार्फत आश्वासित करण्यात आले. सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 2198 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 208 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 44 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1096.3 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या