तासगाव : ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन,महाराष्ट्रतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ यंदा सांगली जिल्ह्यातील १२ उपक्रमशील शिक्षकांना जाहीर करण्यात आला असून, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी (भोसलेनगर) येथील सौ. नुतन उत्तम परीट यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शैक्षणिक क्षेत्रातील निष्ठा,गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्कृष्ट संगम साधत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे यांनी दिली.हा भव्य व दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २९ मार्च २०२६ रोजी निगडी, पुणे येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात पार पडणार आहे.राज्याचे शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, विविध मान्यवर आमदार,अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.सौ.परीट यांच्या या यशामुळे तासगावच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राच्या गौरवात भर पडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तासगावमधील अंधश्रद्धा निर्मूलन समिती,राष्ट्रसेवा दल तसेच विविध पुरोगामी संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.एकूणच,ग्रामीण भागातून पुढे येत शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचे कार्य करणाऱ्या नुतन परीट यांनी पुन्हा एकदा तासगावचा झेंडा राज्यभर फडकवला आहे.
सौ. नुतन परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर”
By -
मार्च २७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या