प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली: उज्वला फाउंडेशन आणि राजमती योग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पोळी होळीसाठी आणि एक पोळी गरजूंसाठी” हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. होळीच्या निमित्ताने घराघरांत बनवण्यात येणाऱ्या पुरणपोळ्यांसोबतच एक पोळी गरजू व दीन व्यक्तींसाठी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमात भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे व युवा नेत्या रसिकाताई खाडे यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संकलित केलेल्या पोळ्यांचे जेवण सर्वांनी मिळून कुपवाड येथील वृद्ध सेवाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाने वाढण्यात आले.
यावेळी भाजपा कार्यकर्त्या उज्वला चौधरी, महादेवी एरंडोली, नंदा गायकवाड, सविता अडगळे, सृष्टी अडगळे, रिया परमाज, श्रेया चौगुले, मनवा मुळे, संगीता मुळे, ज्योती किनीकर, शर्मिला चौगुले, अश्विनी कोथळे, सुकुमार चौधरी, मारुती गायकवाड, सुनील मानकापुरे, गिरीश कोरुचे, नलिनी चौगुले, श्रीमती चौगुले काकू आदी महिला व तरुणी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी पार्श्वनाथ नगरमधील नागरिकांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या