सांगली : सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (पुरवठा शाखा) यांच्या वतीने आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
एलपीजी गॅससंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक 18002333555 वर संपर्क साधावा. तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी लँडलाईन क्रमांक 0233-2600500 वर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच चुकीची किंवा अफवाजन्य माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या