प्रतिष्ठा न्यूज
चिंचणी (ता. तासगाव) : एन.एम.एम.एस. परीक्षेतील दैदिप्यमान यशानंतर विठ्ठलराव पागे विद्यामंदिर, चिंचणी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ' *इन्स्पायर मानक अवॉर्ड २०२५-२६'* साठी शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
*निवड झालेले बालवैज्ञानिक:*
१. राजवर्धन प्रवीण पाटील (इयत्ता ९ वी 'अ')
२. विघ्नेश संजय पाटील (इयत्ता १० वी 'अ')
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे *उपाध्यक्ष सन्माननीय श्री. अविनाश काका पाटील* यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेतून व मार्गदर्शनातून शाळेने विज्ञानाच्या क्षेत्रात ही उत्तुंग झेप घेतली आहे. अविनाश काका पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*यशाचे मार्गदर्शक:*
या प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून *श्री. दगडे ए. जी. व श्री. मस्के ए. यु.* यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील विज्ञान विषय शिकविणारे शिक्षक श्री. भोसले डी. आर. व श्री. पाटील एस. बी. यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देत प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
*शासनाकडून १०,००० रुपयांचे प्रोत्साहन:*
निवड झालेल्या दोन्ही बालवैज्ञानिकांना त्यांचे नाविन्यपूर्ण 'मॉडेल' तयार करण्यासाठी भारत सरकारकडून प्रत्येकी १०,००० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मुख्याध्यापक श्री. एल. एस. खोत यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या