तासगाव:शहरात सालाबादप्रमाणे यंदाही श्रीराम भक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पैलवान कुटुंबीयांच्या वतीने सोमवार पेठ दाणे गल्ली येथील श्रीराम मंदिरात ११८ व्या श्रीरामोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पारंपरिक आणि धार्मिक सोहळ्याचे विशेष महत्त्व असून, अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात आहे.यंदाही श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.हा उत्सव सोमवार पेठ,दाणे गल्ली येथील श्री राम मंदिरात पार पडणार असून, प्रसादाचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर, शिंपी गल्ली, सोमवार पेठ, तासगाव येथे करण्यात आले आहे.पैलवान कुटुंबीयांनी सर्व नागरिक, भाविक आणि परिसरातील भक्तांना कुटुंबियांसह उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.श्रीराम भक्ती,परंपरा आणि एकात्मतेचा संगम असलेल्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी तासगावकर सज्ज झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या