तासगाव:अट्रोसिटी कायद्यांतर्गत होणारी तातडीची अटक थांबवून आधी चौकशी म्हणजे दलितांवरील अत्याचारांना रान मोकळे करण्याचे षडयंत्र आहे.घटनेने दिलेल्या दलितांच्या अधिकाराला नख लावू नका.अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार,युनूस कोल्हापूरे यांनी दिला आहे.अट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत चुकीचे बदल केल्याचे निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पँथर सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे,समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ हे दलितांची दिशाभूल करीत आहे.अट्रोसिटी केंद्राचा कायदा असून हा कायदा दलित,आदिवासी व मागासवर्गीयावरील अन्यायाचा मोठा आधार आहे.अट्रोसिटी कायद्यातील तरतुदीची केवळ अंमलबजावणी राज्य सरकारने करणे आहे.तरी मनमानी करीत अट्रोसिटीतील तातडीची अटक थांबविणे असंविधानिक आहे..राज्यात अट्रोसिटीचे प्रमाण अधिक आहे.याची सत्यता लपविली जात आहे.अट्रोसिटीतील दुर्दैवी पीडितांना न्याय मिळालेला नाही.तेंव्हा सरकारने जाणीवपूर्वक कपट हेतूने अट्रोसिटीतील कडक तरतुदींना फाटा देत आहे.संसदने 1989 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अट्रोसिटी कायदा अस्तिवात आणला आहे.या कायद्याने दलितांना व आदिवासीना संरक्षण आहे.परंतु हाच कायदा कुंमकवत करून दलितांच्यावर अन्याय सरकार करीत आहे.अट्रोसिटीतील नव्या पद्धतीनुसार गुन्हा नोंदविण्यापूर्वी गुन्ह्याची प्राथमिक तपासणी व अहवाल नंतर गुन्हा दाखल होईल.दरम्यान तपास कालावधीत पैसे व सत्ता याचा गैरवापर झाल्यास पीडितांना न्याय मिळणार नाही.अट्रोसिटीची तातडीची अटकेची तरतूद शिथिल करणे म्हणजे गुन्हेगारांचे धाडस वाढविणे आहे.कायद्याची भीती न राहिल्यास दलितांवरील अत्याचारात वाढ होण्यास मदत होईल.अट्रोसिटी कायद्यात बदल करून सरकार नेमके कुणाचे संरक्षण करू पाहत आहे..? हा निर्णय घेऊन सरकार दलित व आदिवासी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसुन विश्वासघात करीत आहे.तेंव्हा अट्रोसिटी कायद्यात कोणताही बदल न करता यातील आरोपींना तात्काळ अटकेची तरतूद जैसे थे ठेवावी.अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी दिला आहे.निदर्शनावेळी राज्यध्यक्षा प्रमिला गावडे,राज्य संपर्क प्रमुख युनूस कोल्हापूरे,जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी,निशांत आवळेकर,अंकुश केंगार,ऋषिकेश गुजले,श्रुष्टी कांबळे,गुरुनाथ धाबडे, राहुल साठे,नितीन जाधव,वालेकर,पूर्वेश खाडे.नवरेश दोडमणी आदि उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या