तासगाव:येथील सामजिक कार्यकर्त्या व महिला चळवळीच्या युवती नेत्या प्रमिला गावडे यांची राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या युवती राज्यध्यक्षपदी निवड करण्यात आली.राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांचे हस्ते प्रमिला गावडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडीनंतर बोलताना गावडे म्हणाल्या शाहू-फुले-आंबेडकर चळवळीत काम करताना सार्थ अभिमान वाटतो.संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात दलित,वंचीत,मागासवर्गीय समाजातील महिलांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात येईल.महराष्ट्रात महिला,युवती,मुली यांच्यावर विविध प्रकारे अन्याय व अत्याचार होत आहेत.याबाबत कडक धोरण राबविण्याबाबत सरकारकडे मागणी करणार आहोत.तेंव्हा जास्तीत जास्त महिलांनी पँथर सेना संघटनेत सक्रिय सहभागी व्हावे.यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार म्हणाले,प्रमिला गावडे यांची निवड ही सार्थ निवड असून कृतीतून त्या सिद्ध करतील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या