मुंबई दि. १३:भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचे सुपुत्र विरेंद्रसिंह आणि चि.सौ.कां प्राजक्ता यांच्या थाटामाटात झालेल्या सांगलीतील शाही विवाह सोहळ्यानंतर मुंबई येथे आयोजित स्वागत समारंभात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यस्त वेळेत वेळ काढून खास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले आणि पाटील कुटुंबियांशी संवाद साधला. याप्रसंगी पृथ्वीराजबाबा पाटील, सौ. विजया पृथ्वीराज पाटील,अजित पाटील, सुवर्णा पाटील, श्रीमती रोहिणी पाटील,ऋतुराज पाटील,श्रीमती जयमाला पवार यांनी कुटुंबियांच्या वतीने स्वागत केले. पृथ्वीराज पाटील यांनी ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढल्याचे सांगून त्यांनी ना. देवेंद्रजी यांचे पाटील परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
स्वागत सोहळ्यात खा. पार्थ अजित पवार, मंत्री सर्वश्री जयकुमार गोरे, मंगलप्रभात लोढा, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आबिटकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जयदत्त क्षीरसागर, आ. जयंत पाटील, आ. अमित देशमुख, आ. प्रवीण दरेकर, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, आ. प्रसाद लाड, आ. अमीन पटेल, आ. सत्यजित तांबे, आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजित देशमुख, आ. हेमंत ओगले, आ. इद्रिस नायकवडी, आ. चंद्रदीप नरके, आ. अशोकराव माने, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, कुणाल पाटील व उल्हासदादा पवार तसेच यशराज शंभूराज देसाई, नवनाथ बन, विश्वास पाठक, किरण शेलार, मुश्ताक अंतुले,आयपीएस दीक्षित गेडाम, डीसीपी अशोक दुधे, नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी श्री. पळसकर, आचार्य पवन त्रिपाठी, राजाराम देशमुख, सचिन सावंत, समीत कदम, दै. पुढारीच्या राजकिय संपादिका मृणालिनी नानिवडेकर,एमएमआरटीचे शंकर देशपांडे, वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार बांधव आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांनी नवदापंत्यास शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. स्वागत सोहळ्यात अगत्यपूर्वक उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिल्याबद्दल या सर्वांचे पृथ्वीराज यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या