प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गांजा विक्री व पुरवठा करणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून २ किलो ८८२ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ३,०२,१५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
*आरोपीचे नांव पत्ता*
१) इम्रान उस्मान सनदे, वय ३२ वर्षे, रा. झुरेवाडी रोड, कारखान्याजवळ, विजयनगर, कवठेमहांकाळ,
२) समीर इब्राहिम नकाशे, वय ३२ वर्षे, रा. ८ वी गल्ली, राजीव गांधीनगर, माळवाडी, जयसिंगपूर, जि. कोल्हापुर.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-*
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने दिनांक ०४/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोहेकों / अमोल ऐदाळे, पोहेकों / सोमनाथ गुंडे आणि पोकों / सुनिल जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे इम्रान सनदे रा. कवठेमहांकाळ ते थबडेवाडी रोडवरील स्मशानभुमीजवळ गांजा माल विक्री करणेकरीता येणार आहे.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, कवठेमहांकाळ ते थबडेवाडी रोडवरील स्मशानभुमीजवळ सापळा लावून थांबले असता, एक इसम बुलेट मोटार सायकलवरुन येवून थांबलेला दिसला. तसा स्टाफला बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव इग्रान उस्मान सनदे, वय ३२ वर्षे, रा. झुरेवाडी रोड, कारखान्याजवळ, विजयनगर, कवठेमहांकाळ असे सांगितले.
सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, बुलेट मोटार सायकलवर अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा तयार गांजा माल मिळून आला. त्यास सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी इम्रान सनदे यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल जादा दराने विक्री करणेकरीता जयसिंगपुर येथील समीर नकाशे यांचेकडून आणला असल्याचे सांगितले. लालगीच सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी गांजा माल व ताब्यातील बुलेट मोटार सायकल पंचासमक्ष जप्त केली आहे.
सपोनि सिकंदर वर्धन यांचे पथकाने इम्रान सनदे यास गांजा माल पुरविणारा समीर नकाशे यांचा शोथ घेतला असता, तो अंकली फाटा येथे असलेबाबत माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गांजा माल इम्रान सनदे यास विक्री केला असल्याची कबूली दिली.
सदर दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रवीद्र भापकर, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहवा / संजय पाटील, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, इसान मुल्ला, संकेत मगदुम, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, पोकों/ सुनिल जाधव, रोहन घरते, चापोकों / सुशांत चिले, पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या