प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व नऊ आरोपींना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.या प्रकरणातील सर्व आरोपींनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नाही.नेहरूनगर येथे घरावर झालेला हल्ला व गाड्या तोडफोडीच्या घटनेनंतर तासगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत या प्रकरणातील आरोपीना अटक केली होती.त्यात सांगली येथील काही युवक होते.त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करतेवेळी त्यांच्या समर्थनार्थ सांगली येथून आलेल्या काही युवकांकडे धारदार शस्त्रे सापडल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती.कोर्टाने याची गंभीर दखल घेऊन त्यांचा जामीन फेटाळल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये विकास शिवाजी जाधव,आकाश सचिन शिंदे,यासीन रियाज शेख,ओंकार सागर सावंत,अबू सुफियान,फिरोज बागवान,तसेच सांगली येथील ऋषीराज प्रवीण झोरे,हनमंत दिगंबर गायकवाड,आरमान हजरत अली कवठेकर आणि सैफ समीर जमादार यांचा समावेश आहे.घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना अटक केली होती.त्यानंतर आरोपींच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.मात्र घटनेचे गांभीर्य आणि तपासाची स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला.न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना कोणताही दिलासा मिळू शकला नसून ते सध्या न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. दरम्यान या घटनेचा तपास तासगाव पोलीस पुढे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या