प्रतिष्ठा न्यूज
सांगली : जिल्ह्यात सध्या ‘खरात प्रकरणा’भोवती मोठी खळबळ उडाली असतानाच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कथितपणे खरातसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या फोटोंच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्या x हॅडलवरून शेअर केलेल्या फोटो मध्ये चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या फोटोचा समावेश आहे. दरम्यान, खरात प्रकरण आधीच गंभीर वादात अडकलेले असून, त्याविरोधात उच्चस्तरीय चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. याच प्रकरणात पोलिसांनी छापे टाकून काही संशयास्पद बाबी उघड केल्याने विषय अधिकच चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे राजकीय नेत्यांच्या संबंधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, हे फोटो नेमक्या कोणत्या काळातील आहेत, त्यामागील संदर्भ काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजकीय विश्लेषकांच्या मते, कोणत्याही नेत्यासोबतचे फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या सर्व कृतींना समर्थन असेलच असे नाही. तरीही विरोधकांकडून या मुद्द्यावरून राजकीय टीका सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, योग्य ती कारवाई होईल असे संकेतही देण्यात आले आहेत.
सांगलीत प्रश्न कायम —
“फोटोचा अर्थ काय? आणि जबाबदारी कोणाची?”
आगामी काळात या प्रकरणावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समाज माध्यमातून विविध चर्चा सुरू आहेत
काही जण कॅप्टन खरात यांच्या कार्यशैलीला आदर्श मानत असल्याचे बोलले जाते, तर दुसरीकडे “यादवकालीन कॅडबरीचा आशीर्वाद” लाभलेले काही नेते देखील त्याच मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे, काही दादांनीही “कॅप्टनचा प्रसाद” घेतल्याच्या बोलक्या चर्चा रंगल्या असून, यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच प्रश्न ऐकू येतोय—नेमका आदर्श कोणाचा घ्यायचा? कार्यपद्धती, विचारधारा आणि नेतृत्व यातून योग्य दिशा कोण देणार?
दरम्यान, सांगलीकर मात्र या सगळ्या घडामोडींवर मिश्कील प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत,
“लाभले भाग्य हे आम्हास, धन्य आम्ही हो सांगलीकर!”
राजकीय रंगत वाढत असताना येणाऱ्या काळात या चर्चांना कोणता आकार येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या