प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : खाडे शैक्षणिक संकुल, मिरज यांच्या वतीने ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक जीवनात आनंदी, सकारात्मक व संतुलित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनमूल्यांवर या व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या व्याख्यानासाठी जीवनविद्या मिशन, पुणे येथील चंद्रकांत निंबाळकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून उपस्थितांना जीवनातील आनंद, समाधान, सकारात्मक विचारसरणी, मानसिक शांतता आणि संतुलित जीवनशैली याबाबत उपयुक्त विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
ही व्याख्यानमाला गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर, दिंडी वेस, मिरज येथे आयोजित करण्यात आली आहे.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असल्याचे सांगत, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच करुणा माने यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या