मिरज प्रतिनिधी : आज गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त मिरजेतील गणेश तलाव स्वच्छता अभियान ची सुरुवात करण्यात आली. यावेळी राजासाहेब ऑफ मिरज फौंडेशन,जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था,निरामय आनंदी कुटुंब, ब्रम्हाकुमारीज,श्री रेणुका मंडळ, मिरज महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ मिरज, संस्कार भारती, निसर्ग सवांद आणि इतर सामाजिक व अध्यात्मिक संस्थानी पुढाकार घेतला आणि स्वच्छता अभियान राबवले. तसेच शाडू व फायबर ची मूर्ती बनवलेल्या श्रीमंत महागणपती मंडळ, मिरज चे अध्यक्ष मा अभिजित कातरकी, उपाध्यक्ष मा अमित पाटील, श्री शिवाजी गणेश उत्सव मंडळ. मिरजचे उपाध्यक्ष मा शेषराज पाटील,तसेच सहभागी सर्व संस्थांचा सत्कार मा माधवराजे पटवर्धन सरकार आणि राणीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
इथून पुढे दर शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत मिरज महानगरपालिका यांच्यासोबत सर्व सामाजिक, आध्यत्मिक व पर्यावरण संस्थानी पुढाकार घेऊन सातत्याने गणेश तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुकुल कॉम्पुटरचे मा सूर्यकांत साळे सर यांच्या सहकार्याने जनजागृतीसाठी सायकल रॅली मिरज महानगरपालिका ते गणेश तलाव पर्यंत काढण्यात आली. याचे उदघाटन मा सूर्यकांत साळे,मा सुधीर गोरे, नगरसेवक मा. मोहन वाटवे, युवराज मगदूम, महानगरपालिका कर्मचारी, मा महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आभार मा सुधीर गोरे सर यांनी मानले. यावेळी मुख्य संयोजक मा मा माधवराजे पटवर्धन सरकार आणि राणीसाहेब, मा सुधीर गोरे, मा राकेश तामगावे, मा युवराज मगदूम, मा. स्मृती पाटील (उपायुक्त, मिरज महानगपालिका), मा.किर्ती जगदाळे,मा निवेदिता दीदी, मा उर्मिला दीदी, नगरसेवक मोहन वाटवे, मा. मारुती नाईक,मा साठे, आरोग्य विभाग कर्मचारी व अधिकारी इत्यादी सहभागी होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या