कोल्हापूर (प्रतिनिधी) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याची पंचवार्षिक निवडणूक 24 मार्च रोजी होत असून प्रागतिक विचारांचे, कोल्हापूर खंडपीठासाठी आंदोलनात्मक भूमिकेतून सतत पाठपुरावा करत भरीव योगदान देणारे, वकिलांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे कोल्हापूरचे सुपुत्र अॅड. विवेकानंद घाटगे यांना महाराष्ट्रातून वकील बांधवांनी मताधिक्य देऊन निवडून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन प्रागतिक वकील मंचचे राज्याध्यक्ष लातूरचे अॅड. रमेश विवेकी यांनी केले.
ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याच्या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत असून कोल्हापुरात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले, ॲड. विवेकानंद घाटगे यांचा अनुक्रमांक 46 असून महाराष्ट्रातील वकील बंधू-भगिनींनी त्यांना प्रथम पसंतीचे मतदान करावे.
यावेळी कोल्हापूरच्या ॲड. करुणा विमल म्हणाल्या, ॲड. विवेकानंद घाटगे हे लढाऊ व्यक्तिमत्व असून कोल्हापूर खंडपीठासाठी त्यांनी आत्मदहन आंदोलन केले होते. तरुण वकिलांसाठी ते सतत प्रेरणादायी राहिले आहेत.
विट्याचे ॲड. हर्षवर्धन भिंगारदेवे म्हणाले, ॲड. विवेकानंद घाटगे हे संविधानचे अभ्यासक असून संविधान लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे महत्त्वाचे वकील विचारवंत आहेत. त्यांना निवडून देणे ही वकिलांच्या हिताची गोष्ट आहे.
सांगलीचे ॲड. सुधीर काकडे म्हणाले, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा ही वकिलांसाठी काम करणारी संघटनात्मक संस्था असून या ठिकाणी ॲड. विवेकानंद घाटगे यांच्यासारखे चांगले व्यक्तिमत्व निवडून जाणे गरजेचे आहे. मागील काळात चेअरमन असताना त्यांनी अतिशय दखलपात्र कार्य वकिलांसाठी केले आहे.
रत्नागिरीचे ॲड. विनायक कांबळे म्हणाले, ॲड. विवेकानंद घाटगे अभ्यासू व्यक्तिमत्व असून कोकणातील वकिलांची त्यांना प्रथम पसंती आहे.
छत्रपती संभाजीनगरचे ॲड. ए. आर. माने म्हणाले, बार कौन्सिलच्या चेअरमन पदी असताना कोविड काळात वकिलांसाठी धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यामध्ये ॲड. ॲड. विवेकानंद घाटगे यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे त्यांना यावेळीही निवडून देणे गरजेचे आहे.
ॲड. विवेकानंद घाटगे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडवोकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर निर्मितीमध्ये, वकील परिषदेच्या अध्यावत नवीन सभागृहनिर्मितीमध्ये, पूरग्रस्त वकिलांना रेशनचे किट वाटपामध्ये, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याच्या निवडणुकीत वकील बंधू भगिनींच्या हितासाठी ते पुन्हा निवडून जाणे गरजेचे असल्यामुळे प्रागतिक वकील मंचच्या वतीने महाराष्ट्रभर ॲड. ॲड. विवेकानंद घाटगे यांना प्रथम पसंतीचे मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी ॲड. एस. पी. माने, ॲड. आर. टी. कांबळे, ॲड. सुनील फड, ॲड. दिगंबर देशमुख, ॲड. ऋषिकेश सूर्यवंशी, ॲड. सौरभ देवकर, ॲड. सुनिता किरण भिंगारदेवे, ॲड. अस्मिता मोरे, ॲड. सी. डी. सूर्यवंशी, ॲड. संजय सीतापुरे, ॲड. यु. डी. रोहिणकर,ॲड. हर्षवर्धन विवेकी, ॲड. शुभांगी सकटे, ॲड. राहुल पाटील, ॲड. के. पी. पाटील, ॲड. बाळासाहेब कांबळे, ॲड. तमन्ना मुल्ला, ॲड. राहुल कांबळे, ॲड. सगट, ॲड. संकेत पाटील, ॲड. सागर चौगुले, ॲड. सुदर्शन देसाई, ॲड. अरुण आवटे, ॲड. अजय निकम, ॲड. सुवर्णा भोसले, ॲड. जयराज जाधव, ॲड. राकेश शिंदे, ॲड. सायली पाटील यांच्यासह कोल्हापूरसह महाराष्ट्रातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या