सांगली : देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असलेल्या संसद भवनाच्या पावित्र्याला धक्का देणारा प्रकार केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान घडल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्ह्याने केला आहे. लोकसभा विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते खासदार श्री.राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वार परिसरात “पार्लमेंट पिकनिक स्पॉट” निर्माण करण्याचा प्रयत्न करून संसदीय शिस्त, परंपरा व नियमांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
लोकसभा अध्यक्षांनी मकर प्रवेशद्वाराजवळ कोणतेही धरणे, आंदोलन किंवा प्रदर्शन करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही काँग्रेस पक्षाने या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संसदीय परंपरांचा अवमान केल्याचे भाजपा नेत्यांनी ठामपणे सांगितले. संसद ही केवळ राजकीय मंच नसून ती लोकशाहीचा आत्मा आहे; त्या पवित्र स्थळाला आंदोलनाचे ‘पिकनिक स्पॉट’ बनविण्याचा प्रयत्न हा देशातील जनतेचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ भाजपा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज सांगली विधानसभा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेसविरोधी घोषणाबाजी करत संसदेत घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. भाजपा सांगली शहर जिल्ह्याने संसद ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची सर्वोच्च संस्था असून तिच्या शिस्तीचा अवमान करणाऱ्यांना जनतेसमोर जाब द्यावा लागेल, असा इशारा देत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.
यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, विशाल पवार, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, हेमलता मोरे, नगरसेविका माया गडदे, योगिता राठोड, नगरसेवक मोहन वाटवे, संतोष पाटील, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणपत साळुंखे, मंडल अध्यक्ष राहुल नवलाई, अमित देसाई, रवींद्र वादवणे, कृष्णा राठोड, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, पांडुरंग कोरे, भूपाल सरगर, राजू पठाण, प्रशांत राठोड, गौस पठाण, सुनील भोसले, शुभम देसाई, प्रवीण कुलकर्णी, भालचंद्र बक्षी, सुस्मिता कुलकर्णी, रेखा इंगळे, ज्योती कांबळे, नवनाथ खिलारे, श्रीकांत वाघमोडे, शुभम चव्हाण, हालेश शेंगाडे, श्रीधर जाधव, आबा जाधव, शुभम कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या