सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषद स्वीय निधीतून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या साठी इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी साठी गुणवत्ता शोध चाचणी आयोजित केली जाते या चाचणीसाठी इयत्ता पहिली वर्गासाठी 16827 विद्यार्थी बसले असून त्यांची गुणवत्ता शोध चाचणी 134 केंद्रातून होणार आहे. केंद्र संचालक संख्या 134 असून 701 पर्यवेक्षकांच्या नियंत्रणाखाली चाचणीचे कामकाज सुरू राहणार आहे.
तर इयत्ता दुसरी साठी 18317 विद्यार्थी बसले असून 134 केंद्रातून त्यांची चाचणी होणार आहे. केंद्र संचालक 134 व 765 पर्यवेक्षकांच्या नियंत्रणाखाली गुणवत्ता चाचणी घेणार आहेत. इयत्ता पहिली व दुसरी गुणवत्ता शोध चाचणीसाठी एकूण 1732 कर्मचारी स्टाफ कार्यरत राहणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान प्रशासक जिल्हा परिषद सांगली श्री विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता शोध चाचणीचे नियोजन पूर्ण झाले आहे.
सदर गुणवत्ता शोध चाचणी सोमवार दिनांक 16/03/2026 रोजी होणार असून इयत्ता पहिली चा प्रथम भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत व इयत्ता दुसरीचा प्रथम भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर दुपारी 1.30 ते 3.00 या वेळेत संपन्न होणार आहेत...
या गुणवत्ता शोध चाचणींना जिल्हा स्तरावरून व गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरील अधिकारी यांच्यामार्फत तालुका निहाय भेटी देण्याचे नियोजन झाले आहे.
गुणवत्ता शोध चाचणी वस्तुनिष्ठपणे व पारदर्शक पद्धतीने घेण्याच्या तसेच चाचणीला कोणतेही गालबोट लागू नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. मोहन गायकवाड यांनी सदर गुणवत्ता शोध चाचणी चे सर्व साहित्य सर्व केंद्रांना वितरित केलेले असून यंत्रणा सज्ज झाली असलेने कामकाज सुरळीत चालेल व गुणवत्ता शोध चाचणी निकोप व पारदर्शक वातावरणात होईल. त्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या