प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव यांच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘माहेर’ या वार्षिक अंकाने विद्यापीठस्तरीय अंक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या ‘माहेर’ अंकास एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.शैक्षणिक वर्ष 2022–24 मधील प्रशिक्षणार्थींनी विविध साहित्यप्रकारांत अभ्यासपूर्ण व दर्जेदार लेखन सादर केले होते. आत्मकथनपर लेखन प्रकारात कु. गौरी शरद पाटील यांना तृतीय क्रमांक तर माहितीपर लेखन प्रकारात कु. ज्योती तानाजी मोटे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.हिंदी भाषेतील व्यक्तीचित्र लेखनासाठी कु.रेखा सुभाष कांबळे यांना प्रथम क्रमांक मिळाला.शिक्षणशास्त्र विषयातील माहितीपर लेखन प्रकारात कु.ऐश्वर्या निवृत्ती गुरव यांना प्रथम व कु.पूजा प्रकाश पाटील यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.संशोधनपर लेखन प्रकारात कु.अश्विनी बाळकृष्ण पवार यांना प्रथम तर कु.ऋतुजा राजकुमार पाटील यांना द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच अभियांत्रिकी विभागातील माहितीपर लेखनासाठीही कु.अश्विनी बाळकृष्ण पवार यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.या यशामुळे ‘माहेर’ अंकाची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम. पाटील यांनी विजेत्या प्रशिक्षणार्थींनींचे अभिनंदन केले. तसेच ‘माहेर’ वार्षिक अंकाचे कार्यकारी संपादक व मार्गदर्शक प्रा. डॉ.लक्ष्मी भंडारे यांच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष प्रशंसा व्यक्त केली.या यशाबद्दल प्रा.डॉ.देवदत्त खजूरकर,प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.अंकुश पंडित,प्रा.प्रमोद शेंडगे, प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हणमंत वाघमारे,सौ.अस्मिता साळी तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या