प्रतिष्ठा न्यूज
सांगली : राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य आणि हिंदुत्त्वाचे धगधगते अग्निकुंड म्हणून ओळखले जाणारे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वा.सावरकरांच्या क्रांतिकारी जीवनकार्याचा आणि त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. “राष्ट्र प्रथम” ही भूमिका अंगीकारत समाजजीवनात संघटनशक्ती अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वा.सावरकरांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून राष्ट्रहितासाठी निष्ठा, शिस्त आणि समर्पण आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी मांडले. उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सावरकरांच्या विचारांचा जागर घडवून आणत संघटन अधिक बळकट करण्याचा संदेश दिला.
यावेळी राज्य परिषद सदस्य श्री.प्रकाश बिरजे, जेष्ठ नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, राजू आवटी, अमोल कणसे, बाळकृष्ण बक्षी, गौस पठाण, श्रीधर जाधव, आबा जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या