प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली: मराठी राज्यभाषा दिन आणि वाचन चळवळीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त वाटेगाव येथे दृष्टी हॉस्पिटल ईश्वरपूर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी डॉ. सुनील पाटील यांचा वाचन चळवळीचे उपाध्यक्ष एम.आर. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य सेवक अनिल भोसले यांचाही गजानन धुमाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शिबिरात पंचक्रोशीतील ५१ रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात रुग्णांची सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून दोन रुग्णांना महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे.
संस्थापक अध्यक्ष राहुल वेदपाठक यांनी सांगितले की, वाचन चळवळीच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी आरोग्य, नेत्र तपासणी व बालसंस्कार शिबिरे आयोजित केली जातात. दृष्टी हॉस्पिटलच्या सहकार्यामुळे अनेक रुग्णांना दृष्टीदोषावर उपचार मिळाले आहेत. कार्यक्रमाला अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या