प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज: येथील माजी पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर दिल्ली येथे झालेल्या AI समिटदरम्यान युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत शर्ट काढून आंदोलन करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी महापौर संगीता खोत, रूपाली देसाई, अनिता हारगे, रामेश्वरी थोरात, सुस्मिता कुलकर्णी, ईशा साठ्ये, सारिका राहूटे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, विद्या दानोळे, वैशाली वाणे, गायत्री सातपुते, संगीता हारगे, हिना जमादार, वैशाली लोंढे, वर्षा माने, जयश्री पवार, अनघा कुलकर्णी, सुरेखा कदम, तसेच सुनीता रूपनर आदी मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवला व काँग्रेस युवा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या