प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघ, सांगली जिल्हा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२६ निमित्त गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, राजमाता जिजाऊ मार्ग, सांगली येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाने होणार असून त्यानंतर मराठा समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री महाराष्ट्र राज्य अजितराव घोरपडे सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तेजस जालिंदर महाडिक (डेंटिस्ट व कॉस्मेटिक) व डॉ. रिचा तेजस महाडिक (डेंटिस्ट) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ सांगली जिल्हाध्यक्ष आर. एस. पवार राहणार आहेत.
मराठा सेवा संघ व इतर सर्व कक्षांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या