गगनबावडा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गगनबावडा येथे गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त शिवजयंती उत्सव समिती व शिवस्मारक समिती यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने शिवगर्जना, मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण आणि विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गगनबावडा हा डोंगराळ व दुर्गम भाग असूनही येथील शिवभक्तांमध्ये शिवजयंतीबद्दल विशेष उत्साह दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची तयारी करत आहेत.
संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व नागरिक, युवक व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय भवानी, जय शिवाजी!

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या