प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. २८ : मराठी ही आपली मायबोली आहे. ती अभिजात भाषा आहे. आपली संस्कृती व परंपरा जपण्यात मराठीचे योगदान मोठे आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल ऐवजी मराठीच्या प्रेमात पडावे. असे प्रतिपादन अजिम नाईक यांनी केले. थोर मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन आज मराठी राजभाषा दिन म्हणून गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल मध्ये उत्साहात साजरा झाला.
प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन व पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. अजिम नाईक सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मोबाईलचा योग्य वापर कसा करावा व त्याचे दुष्परिणाम काय आहेत.. मोबाईलचा शैक्षणिक व किती वेळ वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व ए .पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जीवनातील संघर्ष, अडचणी आणि त्यांनी क्षेपणास्त्र (मिसाईल मॅन) निर्मितीमध्ये केलेले कार्य याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्याचा संदेश दिला. पुस्तक वाचनाचे महत्त्व, देशाचा मान कसा राखावा, तसेच आपल्या मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची गरज आणि सर्व साहित्यांची ओळख यावर त्यांनी विशेष भर दिला.
मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच जगदीश खेबुडकर यांच्या कार्याची व कवितेचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत ,नृत्य नाटिका एकपात्री भूमिका व मनोरंजन कार्यक्रम सादर करून वातावरण आनंदमय केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाचे प्रमुख संतोष जाधव व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संपूर्ण परिसर मराठी भाषेच्या गौरवगीतांनी दुमदुमून गेला.
मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीकमसलत, समन्वयिका विद्या घुगरे, वंदना डोंगरे, रुबीना नदाफ ,प्रणाली ललित, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या