प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मा. आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी ब्रम्हाकुमारीज संस्थेला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच शिव अनुभूती महोत्सवात सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात राजयोग शिबीराची व अध्यात्मिक ज्ञानाची समाजाला अत्यन्त गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केले.
प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयास 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि महाशिवरात्री निमित्त मिरजेत प्रथमच शिव अनुभूती महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार सुरेश भाऊ खाडे व निवासी उपजिल्हाधिकारी मा स्नेहल किणीचे मॅडम (जिल्हाधिकारी कार्यालय सांगली ), मा. सौ स्मृती पाटील (उपायुक्त, सां. मि. कु. शहर महानगरपालिका )यांच्या हस्ते संपन्न झाले.यात 36 फूट शिवलिंग दर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन, सहस्त्र शिवलिंग तसेच त्रिदिवसीय राजयोग शिबीर याचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान आमदार मा डॉ सुरेश भाऊ खाडे हे होते
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा स्मृती पाटील मॅडम (उपायुक्त, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ) उपस्थित होते. यावेळी त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की तणाव मुक्त जीवनासाठी राजयोग ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
उपजिल्हाधिकारी मा स्नेहल किनीचे मॅडम म्हणाल्या की सुखी जीवन करण्यासाठी अशा प्रकारच्या राजयोग व शिवअनुभूती महोत्सवाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व अतिथी यांनी या शिव अनुभूती महोत्सवात आयोजित केलेले प्रदर्शनी, 12 ज्योतिर्लिंग, 36 फुटी शिवलिंग, अध्यात्मिक माहिती सांगणाऱ्या पुस्तकांचा स्टॉल, योग कक्ष इत्यादी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा.तानाजी ओमासे (संचालक, सत्य साई सेवा समिती, मिरज), मा. सुधीर गोरे (पर्यावरण तज्ञ्, मिरज ),मा. विजय रांजणे (संचालक, इस्कॉन संस्था, मिरज )व मिरज आणि ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन न्यू o2 गार्डन, अग्निशामक दलासमोर, सांगलीकर मळा, मिरज येथे दि. 10 फेब्रुवारी. ते 14 फेब्रुवारी या कालावधी पर्यंत केले असल्याने सर्वांनी सदिच्छा भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हाकुमारीज मिरजच्या मुख्य संचालिका मा निवेदिता बेहेन यांनी केले आहे.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन ब्रम्हाकुमारीज मिरजच्या मुख्य संचालिका मा निवेदिता बेहेन यांच्या मार्गदर्शनाखाली मा उर्मिला दीदी, मा संतोषी दीदी, मा चित्रा दीदी व ब्रम्हाकुमारीज परिवारातील सदस्य इत्यादी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या