प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथे आद्यक्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया रचनारे सत्यशोधक जोतिबा फुले यांच्याबरोबरच समाजकारणतील, स्वातंत्र्य चळवळीतील अनेकांचे मार्गदर्शक गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस, कर्तबगार कर्तव्यदक्ष सांगली महिला पोलीस ए. आर. मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना लेखणीपुत्र कुलदीप देवकुळे म्हणाले की, लहुजी वस्तादांनी आपल्या शौर्य, पराक्रम आणि शस्त्रास्त्रविद्येच्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावर अनेक तरुणांमध्ये स्वराज्याची जाज्वल्य भावना निर्माण केली. त्यांनी केवळ शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले नाही, तर गुलामगिरीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दिले आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली.
तर, मातंग समाजाचे युवा नेते व साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्धी जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे (मेजर) म्हणाले की, आपल्या कार्यातून सामाजिक समतेचा आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणारे लहुजी वस्ताद साळवे होते. लहुजी वस्ताद साळवे यांचे ‘सामाजिक समते’चे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे ही आपली जबाबदारी आहे.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी अभिवादन केले. यावेळी, स्वागत प्रास्ताविक दादासो कस्तुरे यांनी केले तर आभार अर्जुन मजले यांनी मांडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या