प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटाची स्थापना करून गटनेते पदी माजी महापौर व नूतन नगरसेवक मा. मैनुद्दीन बागवान यांची गटनेते पदी निवड करण्याची शिफारस शहर जिल्हाध्यक्ष मा.प्रा. पद्माकर जगदाळे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे केली. त्यानुसार विभागीय आयुक्त,पुणे यांनी माजी महापौर व नूतन नगरसेवक मा.मैनुद्दीन बागवान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सांगलीच्या गटनेते पदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन नगरसेवक गजानन मगदूम, करणं जामदार, आजम काझी, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी, अभिजित भोसले,अतहर नायकवडी व नगरसेविका रेशमा चौधरी, शैला ( मामी) दुर्वे, शिरीन पिरजादे, साक्षी बोरगावे, प्रार्थना शिंदे, नसीमा नाईक, रेखा कांबळे, अश्विनी कोळी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तोहीद शेख, सरफराज कच्ची, रज्जाक नाईक, जुबेर चौधरी, अमित शिंदे, ऋषिकेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या