प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘चिंतामणराव करंडक’ आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन व युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या प्रायोजकत्वातून सुरू झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांना ३० मिनिटांपूर्वी विषय देऊन ३० मिनिटांत तयारी व १० मिनिटांत प्रसंगनाट्य सादर करण्याचे आव्हान देण्यात आले होते. एकूण १० महाविद्यालयीन संघांमधील सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पारितोषिक विजेत्यांमध्ये प्रथम विलिंग्डन महाविद्यालय (₹५०००, फिरता करंडक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), द्वितीय कन्या महाविद्यालय (₹३०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) तृतीय डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज (₹२०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
उत्कृष्ट स्त्री अभिनय साक्षी कांबळे,
उत्कृष्ट पुरुष अभिनय प्रणव जांभळीकर,
सर्व पारितोषिके विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी गणपती पंचायतन संस्थान तर्फे विद्यार्थ्यांसाठी युवराज आदित्यराजे पटवर्धन शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. संस्थानाचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
कार्यक्रमास महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रविंद्र ब्रम्हनाळकर, परिषद सदस्य डॉ. विश्राम लोमटे, पदाधिकारी सचिन खेडकर, आर. ए. कुलकर्णी, नारायण आपटे उपस्थित होते. परीक्षक म्हणून चेतना वैद्य, शशांक लिमये व प्रीतम जोशी यांनी काम पाहिले.
अध्यक्षीय मनोगतात राजेसाहेबांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मदतीचा प्रेरणादायी संदेश दिला. प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्वप्ना उदगावकर व सहकारी प्राध्यापक तसेच सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्ना उदगावकर यांनी केले.
उत्साही वातावरणात ‘चिंतामणराव करंडक’ स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या