प्रतिष्ठा न्यूज/कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग विजयराव बोंद्रे दादा, संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे, माजी नगरसेवक श्री. इंद्रजीत बोंद्रे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. राहुल पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, सौ. मयुरी इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, आयटीआयचे प्राचार्य श्री. वागरे, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. मनीष भोसले व अधीक्षक श्री. विठ्ठल आंबले यांनी संयोजन केले.
दरम्यान, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातही श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले. जयंती महोत्सवानिमित्त महाविद्यालयात निबंध, रांगोळी, चित्रकला, प्रश्नमंजुषा आदी एकूण बावीस विविध उपक्रम राबविण्यात आले. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ‘दादांना आठवताना’ या विषयावर मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. बी. बलुगडे यांनी व्याख्यान दिले. तसेच ‘श्रीपतराव बोंद्रे दादा आज असते तर…’ या विषयावरील शहाजी वार्ता या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. डी. के. वळवी यांनी आभार मानले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या इतर शाखांमध्येही श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे दादा यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या