प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : सांगली– मिरज– कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड कार्यक्षेत्रातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेतर्फे कचरा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यवसायादरम्यान निर्माण होणारा उर्वरित कचरा सार्वजनिक रस्त्यावर न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कंटेनरमध्येच टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मा. आयुक्त महोदया यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत बाजार परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवर कचरा साचू न देणे आणि नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात येत आहे.
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन
आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व व्यावसायिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छ बाजारपेठ, स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ शहरासाठी विक्रेते व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडून कुपवाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
या उपक्रमावेळी स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे तसेच संबंधित भागाचे मुकादम उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या