जयसिंगपूर : गायनकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘ओळख परिवार’ यांच्या वतीने ‘ओळख आयडॉल २०२६’ या गायन स्पर्धेचे आयोजन २१ व २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांतील गायकांना आपले गायनकौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचे पाच विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये ७ ते १७ वयोगटातील मुला-मुलींसाठी ज्युनियर आयडॉल, १८ ते ४९ वयोगटातील पुरुषांसाठी मेल आयडॉल, १८ ते ४९ वयोगटातील महिलांसाठी फिमेल आयडॉल, ५० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी सीनियर आयडॉल, तसेच सर्व वयोगटांतील कलाकारांसाठी ड्युएट आयडॉल या विभागांचा समावेश आहे.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी कलाकारांसाठी विविध वैयक्तिक बक्षिसांची तरतूद करण्यात आली असून, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
गायनाची आवड असलेल्या कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :
प्रियदर्शिनी : ९०११९३४६४९
शशीसर : ८२७५२५००९४
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या