प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : मराठी विज्ञान परिषदेच्या सांगली विभागाची पहिली बैठक विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सावरकर विचार दर्शन सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून मराठी विज्ञान परिषदेच्या सांगली विभागाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मराठी विज्ञान परिषद, सांगलीचे समन्वयक सुनील देशपांडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी कार्याची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन संदीप वरठा यांनी केले. यावेळी परिषदेचे विज्ञान गीत सादर करण्यात आले. तसेच परिषदेच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट दाखविण्यात आला.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीदरम्यान सांगली विभागाच्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी
अध्यक्ष : सुनील दिलीप देशपांडे
उपाध्यक्ष : राजीव गजानन पुजारी, कीर्ती सुजितकुमार काटे, डॉ. भाग्यश्री सौरभ वाटवे
कार्यवाह : अतुल गोविंदराव गावडे
सहकार्यवाह : श्रीधर बाबाराव सूर्यवंशी, संदीप बबन वरठा, उत्तम गणपती मंगल
कोषाध्यक्ष : निरंजन रामचंद्र सोहोनी
सहकोषाध्यक्ष : राजेश हिंडसगेरी
प्रसिद्धी विभाग प्रमुख : योगेश विश्वास रोकडे, विजय वसंत कोळेकर
मार्गदर्शक : मोहन यशवंत मद्वाण्णा, दत्तात्रय शिवलिंगआप्पा वर्दे, संतोष सिद्धार्थ कदम, मुकुंद चिंतामणी जोग
कृषी विभाग मार्गदर्शक : रामकृष्ण सिताराम गंगातिरकर
औद्योगिक विभाग मार्गदर्शक : संदीप सोलेय, राहुल प्रभाकर खरे
महिला संपर्क : शशिकला नामदेव शेळके
मार्गदर्शक : डॉ. कीर्ती सुजितकुमार काटे
समन्वयक : रवींद्र बाबुराव केंचे, संजीव वालावलकर
सदस्य : संजय हनुमंत करमरकर, विनायक शशिकांत करमरकर, रवींद्र पांडुरंग कानिटकर, दीपक दतवाडकर, योगेश अशोक माने, माधव नारायण वैशंपायन, अरविंद प्रल्हाद गोखले, सौ. गौरी विनय सहस्रबुद्धे, अदिती अनिल पावडे, अक्षता अशोक देवकते, प्रियंका श्रीनिवास शिंदे, सौ. प्रियंका प्रदीप इचलकरंजे.
बैठकीदरम्यान इच्छुक सभासदांकडून सभासद नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. सांगली जिल्ह्यात विज्ञानविषयक जनजागृती वाढविणे, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, व्याख्याने आयोजित करणे, विज्ञान प्रदर्शन भरविणे तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत विज्ञान पोहोचविणे, विज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सांगली विभागाच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या बैठकीस विज्ञानप्रेमी, शिक्षक, संशोधक तसेच विज्ञान क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या