प्रतिष्ठा न्यूज
सांगली:‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना, सांगली येथे भव्य रक्तदान व अवयवदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला कामगार तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंग कदम यांच्या हस्ते झाले. या शिबिरात तब्बल ४१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.यानंतर दि. २९ सप्टेंबर रोजी अवयवदान जनजागृती शिबिर घेण्यात आले. विमाधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अवयवदानाचे महत्त्व जाणून घेतले. अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून या पवित्र सामाजिक कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत नाझरे, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. नयनिका माने, डॉ. संजना पवार, डॉ. शर्वरी इंगळे, औषध निर्माता उत्तम कातवरे, परिचारिका अवधूत यादव, वरिष्ठ लिपिक प्रशांत चंदनशिवे, बहुउद्देशीय कर्मचारी गणेश चव्हाण, तौहीद कोकणे, अजय पंडित तसेच दवाखान्यातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान आणि अवयवदानाच्या माध्यमातून कामगार वर्गात आरोग्यविषयक सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या