सांगली : सांगली शहरात बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्व. राजमती यशवंत पवार स्मृती बुद्धिबळ महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती क्रीडा मंडळ आणि केपीज चेस अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात एकाच दिवशी, एकाच ठिकाणी तब्बल पाच वयोगटांतील बुद्धिबळ स्पर्धा होणार असून, विजेत्या खेळाडूंसाठी एकूण ₹५१ हजारांची रोख पारितोषिके, ९५ रोख पारितोषिके, १८५ चषक आणि १७५ पदके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना बुद्धिबळाचे गिफ्ट देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० शाळांची निवड करण्यात येणार आहे.
७ वर्षांखालील गटात २०१९ नंतर जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रवेश शुल्क ₹३०० असून प्रथम १० क्रमांकांना रोख पारितोषिक व ट्रॉफी, ११ ते २५ क्रमांकांना ट्रॉफी आणि २६ ते ५० क्रमांकांना पदके देण्यात येतील.
९ वर्षांखालील गटात २०१७ नंतर जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रवेश शुल्क ₹३०० असून प्रथम १५ क्रमांकांना रोख पारितोषिक व ट्रॉफी, १६ ते ३० क्रमांकांना ट्रॉफी आणि पुढील पात्र क्रमांकांना पदके देण्यात येणार आहेत.
११ वर्षांखालील गटासाठी २०१५ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र असून प्रवेश शुल्क ₹३५० आहे. प्रथम २० क्रमांकांना रोख पारितोषिक व ट्रॉफी, २१ ते ३५ क्रमांकांना ट्रॉफी आणि ३६ ते ७० क्रमांकांना पदके देण्यात येणार आहेत.
१३ वर्षांखालील गटात २०१३ नंतर जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रवेश शुल्क ₹३५० असून प्रथम २५ क्रमांकांना रोख पारितोषिक व ट्रॉफी, २६ ते ४० क्रमांकांना ट्रॉफी आणि ४१ ते ८० क्रमांकांना पदके देण्यात येतील.
१७ वर्षांखालील गटात २०१२ नंतर जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. प्रवेश शुल्क ₹३५० असून प्रथम २५ क्रमांकांना रोख पारितोषिक व ट्रॉफी, २६ ते ४५ क्रमांकांना ट्रॉफी आणि ४६ ते ९० क्रमांकांना पदके देण्यात येणार आहेत.
वयोगटानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडूंना आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्ध्यांसोबत बुद्धिबळातील कौशल्य आणि गुणवत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, स्पर्धेसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त शालेय बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक उदय पवार आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच तथा केपीज चेस अकॅडेमीच्या संचालिका पौर्णिमा उपळावीकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी :
केपीज चेस अकॅडेमी
मो. ९०४९०४०१४४ / ७५८८८४३६०५
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या