प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील संत सेना सेवा संघ व नाभिक समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि आदरयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली.संत सेना महाराज मंदिरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर शिवरत्न जिवाजी महाले आणि नरवीर शिवाजी काशीद यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले.स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या महान योद्धयाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.कार्यक्रमास संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, उमेश गायकवाड, प्रवीण जाधव,सुदाम खंडागळे, सोपान गायकवाड, दत्तात्रय सपकाळ,अनिल गायकवाड,आनंदा साळुंखे, यांच्यासह संत सेना सेवा संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या