कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या समाजाला आज दयेपेक्षा करुणेची गरज आहे. कारण गरिबाला दान देणे सोपे आहे, पण गरिबी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारणे कठीण आहे. दुःखी माणसाला दोन शब्द सांगणे सोपे आहे, पण त्याच्या दुःखाचे कारण समजून घेणे कठीण आहे. म्हणूनच करुणा, धम्मविचार म्हणजे केवळ अश्रू नाहीत तर करुणा, धम्मविचार म्हणजे कृती आहे. सध्याची एकूण जात, धर्म व्यवस्था टोकदार होण्याच्या काळामध्ये बुद्धांचा विचार मानवमुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी अस्वस्थ वर्तमानात धम्मविचार क्रांती क्रांतीबीजे रुजवेल असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील यांनी केले.
ते धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आठव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
तत्पूर्वी उद्घाटक धम्म अभ्यासक भदंत एस. संबोधी यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर या महाविद्यालयाला यावर्षीचा धम्मदीप ज्ञानसंवर्धन पुरस्कार प्रदान आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपयांची पुस्तक असे होते. तसेच लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाचे संचालक सचिन मून आणि भारतीय बौद्ध समाजचे अध्यक्ष व धम्म अभ्यासक रंगराव पांडे यांनाही यावेळी धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांची पुस्तक असे होते. या पुरस्कारांचे वितरण डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या हस्ते करण्यात आले.
तिसर्या सत्रात दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आपल्या बुद्ध, धोक्यात गाव आहे, उजेडाच्या सातबाऱ्यावर, धोक्यात गाव आहे, पगाराचा हिशोब मागू नकोस, सांग कुठाय देश माझा, कवी देशपांडे, भोसले, शेख आणि मी चंदनशिवे, बापाचा हुंदका हीच आईची कविता, आमचा राशन कार्डचा रंग बदलत नाही, हॅपी पिरियड्स डे, तिचाही एक प्रियकर होता, गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे, झोपडपट्टी व्हाया सोसायटी, क्रिमरोल, मी निघून जाईन, कोण खरे वारसदार..?, धर्माला चुना लावला, आमचा कांबळे या कवितेचे सादरीकरण करत कवी संमेलनात रंग भरला. विद्रोही कवी पि. के., सतीश घुगरे, पुजा देसाई, रमेश नाईक, संजय पाटील, प्रा. रोशन जाधव, जानवी कांबळे, नामदेव मोरे, सर्वेश पाटील या कवींनीही यावेळी आपल्या कविता सादर केल्या.
प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, स्वागताध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. स्वाती नांगरे, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आणि संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल, प्रा. प्रमिलाताई माने, डॉ. सर्जेराव पद्माकर, अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
श्रीधर पाटील, जी. बी. कांबळे, छाया सूर्यवंशी, प्राचार्य एस. डी. डिसले, डॉ. शोभा चाळके, विश्वासराव तरटे, सुनिल जाधव, विमल पोखर्णीकर, ॲड. संकेत पाटील, गंगाधर म्हमाने, ॲड, सुधीर काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत डॉ. स्वाती नांगरे, प्रास्ताविक ॲड. करुणा विमल यांनी केले. सूत्रसंचालन अभिजित मासुर्लीकर, पुजा देसाई यांनी केले तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या