प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली :- २० वी राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धा दिनांक १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ रोजी हैद्राबाद येथे होणार आहेत. सदर राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धा १४ व १६ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात होणार आहेत. यासाठी जिल्हा मैदानी निवड स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन, सांगली यांच्यावतीने दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता जिल्हा क्रीडा संकूल, कृपामाई हॉस्पिटल समोर, मिरज सांगली रोड, सांगली येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या आहेत. असे संस्थेचे अध्यक्ष मा. गौतमभाऊ पाटील यांनी जाहिर केले आहे. तरी आपल्या शाळेतील / संस्थेतील जास्तीत जास्त खेळाडू पाठवून देऊन सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष मा.मनोहर सारडा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. संजय पाटील सचिव सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन, सांगली मो.नं.-९७६७५९५०५९, डॉ. गणेश सिंहासने मो.नं. ७३८५३५२६२१ यांचेशी संपर्क साधावा. सोबत दिलेल्या https://register.smrsports.com/Competition/Sangli_District_NIDJAM_Selection_Meet_2026 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा. लिंकवर
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या