प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:माहितीचा अधिकार नागरिकांच्या हातात दिलेले एक शस्त्र आहे.दैनंदिन जीवनात याचा वापर करताना जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.या कायद्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सुशासन निर्माण होईल असे मत ॲड.विजय धेंडे,जिल्हा परिषद सदस्य यांनी व्यक्त केले.ते तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश एस.पाटील होते.यावेळी बोलताना ॲड.धेंडे म्हणाले,2005 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा अस्तित्वात आला.या कायद्यात नागरिकांनी याचा वापर कसा करावा,कोणती माहिती मागविता येते,कोणती माहिती मागविता येते नाही,माहिती मागविण्याची पद्धत,माहिती देण्याची प्रक्रिया,अपिलाबाबत तरतूद याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.भ्रष्टाचार मुक्त भारत घडविण्यासाठी व सुशासन निर्माण करण्यासाठी हा कायदा उपयुक्त आहे.याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे.
प्राचार्य डॉ. सुरेश एस.पाटील म्हणाले,माहिती अधिकारानुसार सामान्य नागरिकाला शासनाकडून माहिती हक्काने मागविता येते.या कायद्याचा योग्य पद्धतीने वापर करून व्यक्तिगत व सामाजिक समस्या सोडविणे शक्य आहे.प्रत्येक भारतीय नागरिकाला हा अधिकार देण्यात आला आहे.यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे योगदान महत्वाचे आहे.यां कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.नितीन गायकवाड यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.प्रवीण देशमुख यांनी केले सूत्रसंचालन डॉ.विलास साळुंखे यांनी केले.कार्यक्रमास प्रा.संजय पाटील,ज्युनिअर विभाग प्रमुख, डॉ.शंकर गावडे,डॉ.बी. जे कदम,प्रा.मयुरा जाधव,प्रा.सुनिता कोळपकर,प्रा.टी.यू.मुलानी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या