प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 13 : सांगली जिल्हा खरीप हंगाम दुष्काळ 2026 च्या अनुषंगाने जिल्ह्यात पीक पंचनाम्यांची गतीने कार्यवाही सुरू आहे. 12 ऑक्टोबर 2026 अखेर ट्रिगर 1 मध्ये दुष्काळ घोषित केलेल्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांमधील एकूण 3 लाख 43 हजार 816 खातेदारांपैकी 2 लाख 71 हजार 645 खातेदारांच्या पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्र 2 लाख 81 हजार 393.93 हेक्टर पैकी दि. 12 ऑक्टोबर 2026 अखेर जिल्ह्यातील 2 लाख 23 हजार 520.92 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात खातेदारांच्या संख्येनुसार 79.01 टक्के, तर क्षेत्रफळानुसार 79.43 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही माहिती दिली.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक पंचनाम्यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्राची नोंद घेण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील पीक पंचनाम्यांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मिरज तालुक्यात एकूण 70 हजार 502 खातेदार असून, एकूण क्षेत्र 58 हजार 525.76 हेक्टर आहे. यापैकी 49 हजार 396 खातेदारांचे 41 हजार 15 हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
अपर तहसिल कार्यालय सांगली अंतर्गत एकूण 35 हजार 514खातेदार असून, एकूण क्षेत्र 18 हजार 712 हेक्टर आहे. यापैकी 18 हजार 881 खातेदारांचे 11 हजार 221.33 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
आटपाडी तालुक्यात एकूण 39 हजार 941 खातेदार असून, एकूण क्षेत्र 37 हजार 242.56 हेक्टर आहे. यापैकी 39 हजार 416 खातेदारांचे 36 हजार 268.43 हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
जत तालुक्यात एकूण 86 हजार 768 खातेदार असून, एकूण क्षेत्र 1 लाख 14 हजार 257.24 हेक्टर आहे. यापैकी 70 हजार 943 खातेदारांचे 90 हजार 776.44 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
अपर संख तहसिल अंतर्गत एकूण 59 हजार 961 खातेदार असून, एकूण क्षेत्र 21 हजार 074.37 हेक्टर आहे. यापैकी 52 हजार 318 खातेदारांचे 18 हजार 944.72 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण 51 हजार 130 खातेदार असून, एकूण क्षेत्र 31 हजार 522 हेक्टर आहे. यापैकी 40 हजार 691 खातेदारांचे 25 हजार 295 हेक्टर क्षेत्रावरील पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या