प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :कमी पावसामुळे पाणीटंचाई निर्माण झालेल्या डोंगरसोनी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आ. रोहित पाटील यांच्या निर्देशानंतर टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी डोंगरसोनी घाटमाथ्यावर सोडण्यास सुरुवात झाली आहे.३० सप्टेंबर रोजी कैकाडी वस्तीवर पाणी सुरू करण्यात आले असून, पुढे हे पाणी अंजनी तलावातही सोडण्यात येणार आहे.
१८ सप्टेंबरच्या जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत डोंगरसोनी परिसरातील शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आ.पाटील यांनी दिले होते.त्यानुसार जलसंपदा विभागाने कार्यवाही केली.
द्राक्ष छाटणीचा हंगाम तोंडावर असताना टेंभूचे पाणी उपलब्ध झाल्याने द्राक्षबागांसह अन्य पिकांच्या सिंचनाला मोठा आधार मिळणार आहे. पाणी सुरू झाल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या