सांगली : प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार सन २०२६ जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा तथा जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुकानिहाय एक याप्रमाणे एकूण १० शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच तीन शिक्षकांना विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्हा निवड समितीच्या बैठकीस उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती श्री. ऋषिकेश महेंद्र लाड तसेच जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. प्राप्त प्रस्ताव, गुणांकन व शासन निकषांनुसार पात्र शिक्षकांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक :१. श्री. निलेश जयपाल कांबळे – जि.प. शाळा क्र. १, कसबे डिग्रज – मिरज २. श्री. धनाजी लक्ष्मण केंगार – जि.प. शाळा क्र. १, खरसुंडी – आटपाडी ३. श्री. सोमनाथ मधुकर शिंदे – जि.प. शाळा, मदळमुठी – खानापूर ४. सौ. मायादेवी राजेंद्र कोष्टी – जि.प. शाळा क्र. २, चिंचणी – तासगाव ५. श्रीमती शैलजा अशोकराव चव्हाण – जि.प. शाळा, भिलवडी स्टेशन – पलूस ६. श्री. अमरगोंडा शिवाप्पा हुबनूर – जि.प. कन्नड कन्या शाळा, अंकलगी – जत ७. श्री. विश्वनाथ पांडुरंग सांगोलकर – जि.प. शाळा, नागज – कवठेमहांकाळ ८. श्रीमती लोचना जगन्नाथ धनवडे – जि.प. शाळा, येवलेवाडी – कडेगाव ९. श्री. अशोक तातोबा घागरे – जि.प. शाळा, प. त. शिराळा – शिराळा १०. श्री. सचिन शंकर फल्ले – जि.प. शाळा, कार्वे – वाळवा
विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार
विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी श्री. रमेश रामचंद्र वायचंडे (जि.प. शाळा, गणेशनगर, मल्लेवाडी – मिरज), श्रीमती कल्पना संभाजी सावंत (जि.प. शाळा, अचकनळही – जत) आणि अफिया बेगम इमामुद्दीन सिद्दीकी (जि.प. शाळा उर्दू नं. ३, ईश्वरपूर – वाळवा) यांची निवड करण्यात आली आहे.शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा हा पुरस्कार शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या