प्रतिष्ठा न्यूज
मिरज : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्तरावरील दोन प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रभावी वक्तृत्व, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संसदीय कार्यपद्धतीचे प्रभावी सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षकांची मने जिंकली.टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे संचलित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
या स्पर्धा मराठी ,इंग्रजी आणि संस्कृत भाषेतून झाल्या.
इंग्रजी भाषेतून सानवी पाटील (पहिला गट-तृतीय क्रमांक) ,
अक्सा सर्वरी (पहिला गट- उत्तेजनार्थ), परिधी वांधे (दुसरा गट- प्रथम क्रमांक),शर्वरी पाटील (तिसरा गट- उत्तेजनार्थ).
संस्कृत भाषेतून मृण्मयी जाधव (तिसरा गट-उत्तेजनार्थ) इत्यादींना पारितोषिक मिळाले.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणकला, विचारांची सुस्पष्ट मांडणी आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेसाठी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना स्वाती कोळी यांनी, इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांना माधुरी कांबळे यांनी तसेच संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांना मनोज लिंबिकाई व अमोल लिंबिकाई यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स आयोजित युथ पार्लमेंट स्पर्धेतही केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धती, पंतप्रधान व विरोधी पक्षनेते यांची निवड प्रक्रिया तसेच मुख्य विधेयक "नारी शक्ती अधिनियम" याची माहिती देण्यात आली. कामकाजाचे उत्कृष्ट सादरीकरण करत नेतृत्व, संघभावना, शिस्त, संवादकौशल्य आणि लोकशाही मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवले. यामध्ये आराध्या सलगरे यांनी विरोधी पक्षाच्या बाका वरून प्रभावी प्रश्न विचारत आणि भक्कम युक्तिवाद मांडत प्रतिष्ठेचा "संसद रत्न पुरस्कार" मिळवला.
विशेष गौरव (Commendation)
हर्षवर्धन देशमुख, पूर्वा चव्हाण, निधी देसाई आणि परिधी वांधे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रतिनिधी मंडळाचे नाव उज्ज्वल केले व सर्वांकडून कौतुक मिळवले.या विद्यार्थ्यांना रेवती फडके यांनी मार्गदर्शन केले .रेवती फडके यांनी सांगितले की या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ पुरस्कार जिंकणे नव्हता, तर विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, संसदीय कामकाज आणि संवैधानिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जबाबदारीची जाणीव, चिकित्सक विचारसरणी आणि नेतृत्वगुण विकसित झाले.विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण तयारी मुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणा मुळे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
या दुहेरी यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हार्डी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच प्रशासक रफिक तांबोळी ,उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर आणि समन्वयिका अश्विनी येळकर यांनी मुलांचे कौतुक केले.शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सातत्याने प्रयत्नशील असून शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच वक्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.
या स्पर्धेसाठी शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त ॲड .वीरेंद्र पाटील ,समन्वयक सतीश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यशाची ही परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या