प्रतिष्ठा न्यूज /अक्षय कोठावळे
वाटेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शिव स्वामी सर्वहिताय बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे ग्रंथदान व मिठाई वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर फकिरा यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल सावर्डेकर, सचिव प्रा. नितीन कदम, संचालक योगेश कांबळे, युवा नेते प्रशांत कांबळे तसेच सुबोध कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित नागरिक, विद्यार्थी व युवकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राच्या १०६ प्रतींचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच मिठाई वाटून जयंतीचा आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक समतेच्या संदेशाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या