प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा वायरमेन युनियनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील वारणाली येथे ३० जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली.या कार्यक्रमास युनियनचे संस्थापक अध्यक्ष रूतिक पाटील, अध्यक्ष अविनाश कदम, सचिव राहुल मिसाळ, मीडिया प्रमुख प्रशांत संकपाळ, कमिटी मेंबर दीपक शिंदे यांच्यासह युनियनचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी अनिकेत अंबरुळे यांची कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दरम्यान, सांगली जिल्हा वायरमेन युनियनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आयोजित या रक्तदान शिबिरात वायरमेन बांधवांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन आणि रक्तदानातून जीवनदान, अशा दुहेरी सामाजिक उपक्रमातून सांगली जिल्हा वायरमेन युनियनने आपला प्रथम वर्धापन दिन समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या